- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षण मिळावे,यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू आहे.आज,रविवार आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू आहे.आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले असून लाखो मराठा समाज बांधवांचा जत्था मुंबईत ठाण मांडून बसला आहे.काल शनिवारी बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील नागरिकांनी टेम्पो भरून भाकरीसोबत ठेचा व इतर साहित्य मुंबईतील आंदोलनकर्त्यांना पाठवून एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली.अश्यातच आज रविवारी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कडक उपोषणाचा इशारा दिला आहे.आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण तसेच मुंबई सोडणार नाही व उद्यापासून शरीरात पाण्याचा एक थेंबही घेणार नाही,असा पवित्रा घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.त्यातच आंदोलनकर्त्यांनी घाई गडबड,दगडफेक,गोंधळ करु नये,आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय इथून हटणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे,ते मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही.जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील काळात महाराष्ट्रातील मराठा लोक बाहेर पडतील. त्यानंतर मुंबई तर सोडा येथून दोनशे किलोमीटर माणसे पाहायला मिळतील.मी जे बोलतो ते करतोच हे सर्वांना माहिती आहे.असेही ते म्हणाले.त्यामुळे आता मराठा आरक्षणावर सरकार काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची डोकेदुखी वाढण्याची नाकारता येणार नाही.
- Advertisement -

