Tuesday, August 25, 2026
Homeचंद्रपूरट्रक आणि बोलेरो कारची समोरासमोर जोरदार धडक; कार पलटी.. - ब्रम्हपुरी तहसीलचे...

ट्रक आणि बोलेरो कारची समोरासमोर जोरदार धडक; कार पलटी.. – ब्रम्हपुरी तहसीलचे दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तहसील कार्यालयाचे दोन नायब तहसिलदार व पाच कर्मचारी बोलेरो कारने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाला जात असतांनाच वाटेतच विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि बोलेरो कारची मूल-चंद्रपूर मार्गावरील डोनी फाट्याजवळ काल गुरुवारी सकाळच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की,कर्मचाऱ्यांची कार काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली.नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. मात्र,दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाले.सर्वांनी कारमधून स्वतःची कशीबशी सुटका केली.अपघातात नायब तहसीलदार विनोद बोडे,नायब तहसीलदार महानंदा मडावी वय ५० वर्षे,रा.ब्रम्हपुरी,सहाय्यक महसूल अधिकारी सरिता बालकृष्ण चन्ने वय ४६ वर्षे,रा.ब्रम्हपुरी,लिपिक प्रिया शेंडे वय ४५ वर्षे,रा.ब्रम्हपुरी,लिपिक दुर्गा गायकवाड वय ४५ वर्षे,रा.सिंदेवाही,आशा दिलीप कोहळे वय ४२ वर्षे,चालक सूरज रामकृष्ण नेहाटे वय ३१ वर्षे,रा.मालडोंगरी अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
ब्रम्हपुरी तहसील कार्यालयाचे दोन नायब तहसीलदार व पाच कर्मचारी एमएचजी ३४ सीडी ७५६२ क्रमांकाच्या बोलेरो कारने चंद्रपूर येथे प्रशिक्षणाला जात होते.जात असतांनाच चंद्रपूरकडून येणाऱ्या एम एच ३४ बी झेड ६७९२ क्रमांकाच्या ट्रकने बोलेरो कारला मूल-चंद्रपूर मार्गावरील डोनी फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक दिली.धडकेत कार उलटली.सर्वांनी कारमधून स्वतःची कशीबशी सुटका केली.दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना तात्काळ मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुटी देण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!