Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीअपघातात मृत पावलेल्या चार मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे धनादेश...

अपघातात मृत पावलेल्या चार मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे धनादेश वितरण.. – गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील काटली गावाजवळ झाला होता अपघात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली-आरमोरी महामार्गावर काटली येथे ७ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत मृत्यू पावलेल्या चार निरागस मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण वीस लाख रुपयांची आर्थिक मदत आज,गुरुवार २१ ऑगस्ट रोजी देण्यात आली. गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि आमदार डॉ.मिलींद नरोटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मृतकांच्या पालकांना या मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.या अपघातात पिंकू नामदेव भोयर वय १४ वर्षे,तन्मय बालाजी मानकर वय १६ वर्षे,दिशांत दुर्योधन मेश्राम वय १५ वर्षे आणि तुषार राजेंद्र मारबते वय १४ वर्षे सर्व रा.काटली, ता.जि.गडचिरोली,या चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्यांच्या कुटुंबियांच्या हाती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील मदतीचे धनादेश देण्यात आले.तसेच दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले क्षितीज तुळशीदास मेश्राम वय १४ वर्षे आणि आदित्य धनंजय कोहपरे वय १५ वर्षे या दोघांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारली आहे.उपचारात कोणतीही कमतरता राहू नये,असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.मृतकांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरणवेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे नायब तहसीलदार चंदू प्रधान,डॉ. मनोहर मडावी यांचेसह प्रशांत वाघरे,अनिल पोहनकर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!