- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्यात खरीप हंगामानुसार खतांची उपलब्धता,विक्री आणि गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी निविष्ठाधारकांची तपासणी करण्यासाठी मोहीम राबवून आठ निरीक्षक आणि एका भरारी पथकांची मदत घेण्यात आली.शेतकऱ्यांना एमआरपी दराने खते पुरविण्यासाठी आणि अनावश्यक निविष्ठा जोडणी थांबवण्यासाठी शनिवारपासून जिल्ह्यातील कृषी निविष्ठाधारकांची मोहीम राबविण्यात आली. ईपीओएस मशीनद्वारे खतांची विक्री करणे बंधनकारक असतांनाही,ईपीओएसवरील साठा आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये अनेक ठिकाणी तफावत आढळून आली.तसेच परवान्यानुसार इतर अनियमितता आढळून आल्या.कृषी निविष्ठांच्या खरेदी, विक्री, साठवणूक आणि जोडणीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी गोंदिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी झाली. यामध्ये दोन कृषी इनपुट सेंटरचे परवाने रद्द करण्यात आले तर सात केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.तर पाच कृषी केंद्रांना कडक इशारा देण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

