Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीआजपासून शहीद नक्षल सप्ताह; पोलीस दलांना सतर्क राहण्याचे आदेश..!

आजपासून शहीद नक्षल सप्ताह; पोलीस दलांना सतर्क राहण्याचे आदेश..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा बोलबाला कमी झाला असला तरीही नक्षलवादी चोरी-छुपे डोके वर काढून हिंसक कारवाया करू शकतात.अश्यातच पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आलेल्या नक्षल्यांच्या स्मरणार्थ आज,सोमवार २८ जुलै पासून ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल्यांकडून शहीद सप्ताह साजरा करण्यात येत असल्याने सदरच्या काळात नक्षलवादी नक्षली स्मारके तयार करून बॅनर लावत असतात.या कालावधीत नक्षलवादी हिंसक घटना घडवण्याची शक्यता असते.शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांकडून कोणतीही हिंसक घटना घडू नये म्हणून,जिल्हा पोलिस दलाकडून नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.शहीद सप्ताहात पोलिस विभाग नक्षलवाद्यांच्या कारवायांवर करडी नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहेत. विशेषतः या सप्ताहात वैद्यकीय रजा वगळता पोलिस अधिकारी आणि जवानांच्या सर्वप्रकारच्या रजा रद्द करण्यात आले असून जिल्हा पोलिस दल सतर्क झाले आहे.यासोबतच गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे आणि पोलिस मदत केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!