Wednesday, July 29, 2026
Homeनागपूर२० वर्षीय तरुणाचा पोहण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू..

२० वर्षीय तरुणाचा पोहण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-तलाव व नद्यांचे वाढते आकर्षण शहरी तरुणांसाठी जीवघेणे ठरू लागले आहे.शिक्षणासह नोकरी करणारे पाच तरुण सुट्टी असल्याने काल,शनिवार २६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास हिंगणा शहरापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या सालईमेंढा शिवारातील तलावाच्या काठी फिरायला गेले होते. परिसरात काही वेळ फेरफटका मारल्यानंतर पाच पैकी चौघे पोहण्यासाठी तलावात उतरले.खोल पाण्यात गेल्याने यातील एक जण व त्याचा मित्र गटांगळ्या खाऊ लागले.उर्वरित दोघांनी एकाला पकडून तलावातून बाहेर काढले.मात्र,यात २० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला.पीयूष सूरज सुखदेवे वय २० वर्षे,रा.भिलगाव,ता.कामठी असे तलावात बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. पीयूष व त्याचे मित्र मृणाल विमेश उके वय २० वर्षे, हर्ष सिद्धार्थ थुलकर वय १९ वर्षे दोघेही रा. कपिलनगर,नागपूर,करण लक्ष्मण चौधरी वय १८ वर्षे, रा.बाराखोली,जरीपटका,नागपूर व क्रिश प्रकाश स्वामी वय १९ वर्षे, रा.रेल्वे क्वार्टर,मोतीबाग,नागपूर हे पाचही मित्र फिरायला गेले होते.पीयूष तलावात बुडताच घाबरलेल्या मित्रांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.ठाणेदार जितेंद्र बोबडे व सहकारी पोलिसांनी पीयूषचा शोध घेण्यासाठी स्थानिक तरुणांची मदत घेतली.मात्र,पियूषचा मृतदेह सापडत नसल्याने त्यांनी
नागपूर महानगरपालिका व हिंगणा तालुक्याच्या वानाडोंगरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.त्यांनी बोटीद्वारे पीयूषचा पाण्यात शोध घेत पाच तासांनी मृतदेह बाहेर काढला.यावेळी पीयूषचे वडील सूरज सुखदेवे,मामा अमर तागडे व नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते.पियूषचा मृतदेह पाहून एकच आक्रोश केला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) व सालईमेंढा तलाव धोकादायक ठरत असल्याने तलावात कुणीही उतरू नये,अश्या सूचनांचे जागोजागी फलक लावले आहेत. मात्र,तरुण मंडळी या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि अमूल्य जीवन नष्ट करतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!