Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरघरी कुणीही नसतांना १९ वर्षीय तरुणीने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या..

घरी कुणीही नसतांना १९ वर्षीय तरुणीने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर(पूर्वीचे बल्लारशाह) तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.घरी कुणीही नसतांना एका १९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास
बल्लारपूर तालुक्याच्या विसापूर येथे उघडकीस आली.दुर्गा प्रकाश चिंचुलकर रा.विसापूर,सुरभी चौक,ता.बल्लारपूर,जि.चंद्रपूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.आत्महत्येचे कारण अद्यापही कळालेले नसून प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दुर्गाने आत्महत्या केली,त्यावेळेस घरी कुणीही नव्हते.आई आणि भाऊ कामासाठी बाहेर गेले होते.दुपारी चारच्या सुमारास शेजारच्यांना दुर्गा ही घरात लटकलेल्या अवस्थेत दिसून आली.त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती विसापूर पोलिसांना दिली.त्यानुसार ठाण्यातील अजय झोडे आणि राकेश मेंढे यांनी घटनास्थळी धाव घेत लटकलेल्या दुर्गास खाली उतरवले असता दुर्गाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून दुर्गाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.घटनेची माहिती आई व भावास
कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास एपीआय करिष्मा मोरे,अजय झोडे व राकेश मेंढे करीत आहेत.मृत तरुणीचे वडील प्रकाश चिंचुलकर हे दुर्गा लहान असतांनाच मरण पावले होते.त्यामुळे आईने सांभाळ करून लहानाचे मोठे केले होते.अश्यातच मुलीने एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलल्याने आईच्या काळजाला मोठा धक्का बसला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!