Tuesday, April 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवादी ठार तर एक जवान शहीद..

सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवादी ठार तर एक जवान शहीद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद्यांचा नक्षलवादी बनण्यामागचा मुख्य उद्देश काय? पूर्वी आदिवासी बांधव वा नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध लढा देण्यासाठी नक्षल संघटना उभारण्यात आली असल्याचे नक्षलवादी सांगायचे.मात्र,आता आदिवासी बांधव वा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम नक्षलीच करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने हे बिगार धंदे नक्षलवाद्यांनी सोडून द्यावे.अंगात रगी आहे,तोपर्यंत जंगलो-पहाडी फिरून कार्य करणार.पण ज्यावेळी शरीर साथ सोडेल,अश्यावेळी काय करणार? त्यामुळे आत्मसमर्पण शिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नसणार.अश्यातच झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात दोन नक्षलवादी ठार झाले तर सीआरपीएफ कोब्रा बटालियनचा एक जवान शहीद झाला.
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील गोमिया पोलिस स्टेशन परिसरातील बिरहोर डेरा जंगल परिसरात काल बुधवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.चकमकीत नक्षल्यांनी सुरक्षा दलाचा वाढता प्रभाव पाहून काढता पाय घेतला.दुपार पर्यंत चाललेल्या चकमकीनंतर दोन नक्षलिंचे मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागले असून
ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे.यात प्राण गमावलेला कोब्रा बटालियनचा सीआरपीएफ जवान आसाम राज्यातील कोक्राझारचा रहिवासी होता.आसामचे शूर आणि आई भारती यांचे पुत्र,कोक्राझारचे रहिवासी ‘सीटी/जीडी’ पारणेश्वर कोच झारखंडमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. आसामचे लोक त्यांच्या बलिदानाला सलाम करतात.आम्ही नेहमीच त्यांच्या (सैनिकाच्या कुटुंबाच्या) पाठीशी उभे राहू आणि हे बलिदान व्यर्थ जाणार नाही.नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी आमचे सैन्य सर्व शक्तीनिशी कार्यरत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार...

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!