- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सोमवार १७ मार्च २०२५ रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी मास्टरमाइंड फहीम खान सह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.फहीम खान वर ५०० हून अधिक दंगलखोरांना गोळा करण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे.दंगल उसळली व दगडफेक,तोडफोड, जाळपोळ करून शांत असलेल्या राज्याच्या उपराजधानीला गालबोट लागले.त्यामुळे मध्य नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम शमीम खान वय ३८ वर्षे याच्या अडचणी सातत्याने वाढत होत्या.फहीम खान नागपूर शहराच्या संजयबाग कॉलनी येथील रहिवासी असून तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे.गणेशपेठ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध १८ मार्च २०२५ रोजी देशद्रोहासह इतर विविध गंभीर गुन्हे दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. बऱ्याचवेळा त्याच्या वकिलांकडून जामीन अर्ज करण्यात आला होता.मात्र,जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता.अश्यातच आज,शुक्रवार ११ जुलै रोजी फहीम खान याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.येत्या सोमवारनंतर तो कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सत्र न्यायालयात फहीम खानच्या वकिलांनी, दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे त्याला आता तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही,असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने फहीम खानला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.न्यायालयाने जामीन देतांना काही अटी व शर्तीही घातल्या आहेत.त्यानुसार,फहीम खानला आता आठवड्यातून दोनदा,म्हणजेच मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.तसेच,प्रकरणाच्या पुढील तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
- Advertisement -

