- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-येत्या आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरो-शोरोसे मैदानात तग धरण्याचा प्रयत्न करू लागलेत.पण काहीजण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नाहीत तर लालचेने इकडून तिकडे उड्या मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अश्यातच काल, शनिवारी नागपुरात शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता तथा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. मेळाव्यात हजारो कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. अश्यातच उद्धव ठाकरे गट,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही माजी नेत्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत असतांनाच नागपूरचा कुख्यात गुंडा युवराज माथनकर यानेही शिंदे सेनेत पक्ष प्रवेश केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. विविध गंभीर आरोपांतून कारागृहात गेलेल्या माथनकरचा प्रवेश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सर्वांच्या नजरेत आला आणि सर्वांच्या मुखी एकच चर्चा सुरू झाली. माथनकर थेट उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन शिवसेनेचा दुपट्टा स्विकारतो आहे.महत्वाचे म्हणजे,युवराज माथनकर नागपूरमध्ये हार्डकोर गुन्हेगार म्हणून ओळखला जातो.त्याच्यावर खंडणी,खून अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.२०१६ मध्ये नागपूरमधील एका प्रसिद्ध बिल्डरला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती.इतकेच नव्हे,तर त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यात आला होता. नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध कलम ४४८,४५२, १४१,१४३,१४७,१४८,१४९,५०५,५०६ (ब) अंतर्गत अनेक गुन्हे दाखल होते.मात्र,बहुतांश प्रकरणांत तो निर्दोष सुटला असला तरीही नागपूरमध्ये तो अजूनही ‘गुंडा’ आणि ‘गँगस्टर’ म्हणून ओळखला जातो.अशा व्यक्तीने राजकीय पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.माथनकरने प्रवेशानंतर फार वेळ कार्यक्रमात न थांबता तात्काळ तेथून निघाला.मात्र,व्हिडिओमुळे या प्रकरणाने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.अश्यातच त्याच्या या पक्षप्रवेशाच्या चर्चाबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज गोजे यांनी आज,रविवार २९ जून रोजी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे.ते म्हणाले की, ‘शिवसेनेचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश घेण्यात आला.यामध्ये आमच्या पक्षात युवराज माथनकर नामक व्यक्तीचा प्रवेश झाल्याचे माध्यमांमध्ये बातमी लागल्यामुळे आम्हाला कळले.पण तसा पक्ष प्रवेश झाल्याचे शिवसेनेकडून फेटाळण्यात आले आहे’, असे गोजे यांनी स्पष्ट केले आहे.ते पुढे म्हणाले की, ‘आमच्या पक्षप्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत युवराज माथनकर याचे नाव नव्हते.युवराज माथनकर नामक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी प्रवेश केल्याची माहिती आम्हाला नाही.काल पक्षप्रवेश होतांना मोठ्या संख्येने गर्दी होती.याच गर्दीत तो कोणासोबत तरी आला असावा आणि त्याचा गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकण्यात आला असावा.त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने’ शिवसेनेने हे वृत्त फेटाळले आहे.तो मंचावर व्हिडिओमध्ये दिसत आहे.मात्र, उपमुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री असल्याने अनेक लोक काम घेऊन येतात,तसा तो पण आला असू शकतो.तो व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आम्ही नाकारत नाही,पण त्याचा पक्ष प्रवेशाशी संबंध नाही’, असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज गोजे यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

