- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पावसाने आता सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.तर काही भागात पावसाची झळ दिसून येत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी नदी,नाले ओसंडून वाहू लागलेत.राज्याच्या विविध भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.आज,रविवार २९ जून रोजी गडचिरोलीसह चंद्रपूर व इतरही जिल्ह्यात पावसाची दिवसभर रिपरिप सुरू होती.अश्यातच आता नुकतेच काही वेळापूर्वी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या संदेशानुसार येत्या पुढील ३ तासांत चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस,वादळ,सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह गडगडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहण्याचा संदेश देण्यात आला आहे.
- Advertisement -

