Monday, August 24, 2026
Homeनागपूरगुन्हेगार बनले वसुली एजंट....- नागपूर परिसरातील प्रकार

गुन्हेगार बनले वसुली एजंट….- नागपूर परिसरातील प्रकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :-पोलिसच गुन्हेगारांना हाताशी धरून वसुली करीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बजाजनगर ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांनाच आपला वसुली एजंट नियुक्त केले आहे. पोलिसांच्या या दलालांनी संपूर्ण आयटी पार्क परिसरात दहशत पसरवून ठेवली आहे.ते स्वतःसोबतच पोलिसांसाठीही वसुली करीत आहेत. बोरकर नावाच्या या गुन्हेगाराचा मोठा भाऊ आधी पोलिसांसाठी वसुलीचे काम करीत होता.आता तो अवैध सावकारी करून लोकांची पिळवणूक करत आहे आणि वसलीचे काम लहान भावाकडे दिले आहे. दुकानदारांनुसार,संपूर्ण आयटी पार्क परिसरात बोरकर बंधुंची दहशत आहे.व्हीएनआयटी आणि आयटी पार्क परिसरात खाद्य पदार्थांचे ७० ते ८० ठेले लागतात. व्हीएनआयटीचा परिसर बजाजनगर आणि आयटी पार्कचा परिसर प्रतापनगर ठाण्यांतर्गत येतो. तुकडोजीनगर परिसरात बोरकर बंधुंचे घर आहे. बोरकर बंधूंची टोळी खाद्य पदार्थांचा ठेला लावणाऱ्यांना धमकावतात.प्रत्येक दुकानदाराकडून महिन्याचे तीन ते साडेतीन हजार रुपये खंडणी वसुलतात.रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणाऱ्या दुकानातून वसुली केली जाते.जे पैसे देत नाही त्यांना दुकान लावू दिले जात नाही.दोन्ही ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी वसुली करण्याचे काम बोरकर बंधूंना दिले आहे.दुकानदारांचे म्हणणे आहे की,गुन्हेगार आणि पोलिसांचे आपसात संगणमत असल्यामुळे तक्रारही करता येऊ शकत नाही.जर कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती त्यांना मिळते आणि ते धमकावण्यासाठी येतात.दोन्ही भावांची परिसरात इतकी दहशत आहे की,दुकानदार व नागरिक वरिष्ठांकडेही त्यांची तक्रार करण्याचे धाडस करत नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!