- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शहराच्या विश्राम गृहात आज,मंगळवार १७ जून रोजी वंचित बहुजन आघडीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देत ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण या नितीमूल्यांवर आधारित पुढील रणनीती आखण्यात आली.त्यातच वंचित बहुजन आघाडीचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील रिक्त तसेच फेर निवडीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या देसाईगंज शहराध्यक्षपदी प्रा.अशोक मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.गडचिरोली विश्राम गृहातील बैठक प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे,जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमराव शेंडे,रघुनाथ दुधे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निमगडे,देसाईगंज तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सोनलदिप देवतळे,राजु वाकडे,गडचिरोली शहराध्यक्ष मंगेश साळवे यांचेसह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.प्रा.अशोक मेश्राम यांच्या देसाईगंज शहराध्यक्ष पदी निवडीचे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करुन देसाईगंज शहरात वंचित बहुजन आघाडीच्या उभारणीसाठी मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला.
- Advertisement -

