Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीआजपासून गडचिरोली,चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यास पावसाचे यलो अलर्ट.. - पुढील पाच दिवसात...

आजपासून गडचिरोली,चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यास पावसाचे यलो अलर्ट.. – पुढील पाच दिवसात तापमानात होणार घट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-निसर्ग शेतकऱ्यांवर किती कोपला आहे; हे आजपर्यंत उसंत घेतलेल्या पावसावरून दिसून येत आहे.ज्यावेळी शेतकऱ्यांच्या धानाची कापणी होऊन मळणी सुरू होती व धान घरी येऊ लागलेत,अश्यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला.काही शेतकऱ्यांच्या शेत बांधावरील कळपा भिजून अंकुर फुटले होते.कित्तेक शेतकऱ्यांच्या धानाची नासाडी झाली तर कित्तेक शेतकऱ्यांचे धान ओलेचिंब होऊन कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागले.यामुळे शेतकऱ्यांचे नशीब किती फाटके म्हणावे लागेल.अश्यातच आता नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने आज,सोमवार १६ जून ते २० जून पर्यंत पुढील पाच दिवस गडचिरोली,चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यास पावसाचे यलो अलर्ट जारी केले आहे.तर उद्या, मंगळवार १७ जून ते २० जून पर्यंत चार दिवस गोंदिया,भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यास पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहे.तसेच पुढील पाच दिवसांत विदर्भाच्या कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.देण्यात आलेल्या यलो अलर्ट नुसार एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वारा ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता नागपूर हवामान केंद्राने वर्तवली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!