Friday, September 4, 2026
Homeनागपूरभूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्यास टाळाटाळ; ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..

भूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्यास टाळाटाळ; ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-वंदना वसू व सारिका डाहाके या दोन ग्राहकांनी विक्रीस काढलेल्या भूखंडाची खरेदी करण्यास हॅपी होम डेव्हलपर्स सोबत करारनामा केला.मागणीनुसार रक्कमही भरणा केली.त्यातच भूखंडांचे विक्रीपत्र नोंदविण्यासाठी वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्याने अखेर ग्राहक तक्रार निवारण आयोगात दोघींनाही धाव घ्यावी लागली. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष सतीश सप्प्रे व सदस्य मिलिंद केदार यांनी दिलासा दिला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,हॅपी होम डेव्हलपर्सने नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील ब्राम्हणी येथील ले-आउटमधील भूखंड विक्रीस काढले होते.त्यामुळे वसू यांनी ३ लाख ७६ हजार ६५८ रुपयांत दोन भूखंड खरेदी करण्यासाठी १९ डिसेंबर २०१२ रोजी तर,डाहाके यांनी ३ लाख ७० हजार १५० रुपयांत दोन भूखंड खरेदी करण्यासाठी १२ एप्रिल २०१३ रोजी करार केला.त्यानंतर वसू यांनी ५ ऑगस्ट २०१५ पर्यंत एकूण ३ लाख ४७ हजार १०० रुपये तर,डाहाके यांनी ५ नोव्हेंबर २०१४ पर्यंत एकूण ३ लाख १६ हजार ८०० रुपये डेव्हलपर्सला दिले.असे असतांना डेव्हलपर्सने भूखंडांचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. वारंवार कळवूनही चालढकल करून वेळ मारून नेल्या जात होती.त्यामुळे वसू व डाहाके यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.त्यानुसार ग्राहकांसोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे हॅपी होम डेव्हलपर्सला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची चपराक बसली.आयोगाने दोन पीडित ग्राहकांचे एकूण ६ लाख ६३ हजार ९०० रुपये नऊ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश डेव्हलपर्सला दिला.ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी ३५ हजार,याप्रमाणे एकूण ७० हजार रुपये भरपाईसुद्धा मंजूर केली.त्यामुळे दोन्ही ग्राहकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!