Thursday, September 3, 2026
Homeनागपूरभाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? - नाना पटोलेंचे टीकास्त्र..

भाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? – नाना पटोलेंचे टीकास्त्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पुन्हा एकदा विधानसभेच्या निकालावरून काँग्रेसचे घमासान सत्र सुरू झाले असून भाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? असे नाना पटोलेंनी टीकास्त्र उगारले आहे.ते नागपुरात माध्यमांशी बोलतांना म्हणाले की,नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणूक आयोगाची बाजू मांडली.आताही फडणवीस, बावनकुळे हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत.भाजपचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का? शिर्डी मतदारसंघात सत हजार मतदार कसे वाढवले याचे पुरावे आहेत.ज्या मतदारसंघात मतदारांची जेवढी मतदार संख्या बोगस पद्धतीने वाढविली तेवढेच मताधिक्य त्या मतदारसंघात भाजपला मिळाले आहे.आम्ही पुराव्यानिशी मतदारयाद्यातील घोटाळा व बोगस मतदान दाखवतो, हिम्मत असेल तर भाजपा नेत्यांनी ते खोडून दाखवावे,असे आव्हान पटोले यांनी केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने दरोडा टाकत निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला,असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.तसेच राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.नाना पटोले म्हणाले,निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले,यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? हा मतांवर सरळ सरळ दरोडा टाकलेला आहे.
पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले,चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतपत्रिकेत कसा घोटाळा करून भाजपाला विजयी घोषित केले होते हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जगाने पाहिले आहे.वाराणसी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर होते.नंतर यंत्रणा कामाला लागली व निकाल वेगळा लागला,हे उघड झाले आहे. निवडणूक काळात भाजपच्या मर्जितील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कशी जबाबदारी दिली हेही उघड आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक जिंकलेली आहे.लोकशाहीला हा कलंक असून निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.असे पुन्हा एकदा विधानसभेच्या मुद्यांवरून नाना पटोलेंनी टीकेची तोफ डागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!