- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-पाच वर्षीय चिमुकला
मंदिर परिसरात ठेवलेल्या ट्रॅक्टरजवळ खेळत असतांना ट्रॅक्टर चालकाच्या ध्यानात न आल्याने ट्रॅक्टर सुरू करून मागे घेण्याच्या प्रयत्नात चिमुकला ट्रॅक्टर ट्रॉली व मंदिर परिसरातील खांबाच्या मधोमध सापडून मृत्यू झाल्याची घटना देसाईगंज तालुक्याच्या कोरेगाव येथे काल,गुरुवारी ५ जूनच्या दुपारी घडली.लक्की रवी बनपूरकर वय ५ वर्ष,रा.कोरेगाव असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
माहितीनुसार,कोरेगाव येथील रवी बनपूरकर यांचा ५ वर्षीय मुलगा घरा शेजारील शिवमंदिर परिसरात ठेवलेल्या ट्रॅक्टरजवळ खेळत होता.तितक्यातच गावातील गोविंदा ठाकरे हे ट्रॅक्टर सुरू करण्यास गेले.मात्र,त्यांना लक्की हा ट्रॅक्टरजवळ खेळत असल्याचे लक्षात न आल्याने लक्की हा ट्रॅक्टर ट्रॉली व मंदिर परिसरातील खांबाच्या मधोमध सापडला.यात लक्कीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मुत्यु झाला.घटनेची माहीती देसाईगंज पोलीसांना कळताच घटनास्थळ गाठून शव देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.त्यानंतर चीमुकल्यावर सायंकाळच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

