उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील करेमार्का भैरामगड परिसरात भांबरेजलेल्या नक्षलवाद्यांनी काल गुरुवारच्या रात्री महाराष्ट्रातून कांदे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक-एमएच १६ सीसी ६७४४ पेटवला.तर प्रवाशांनी भरलेली एक बस ताब्यात घेतल्याने काहीकाळ प्रवाशांची घाबरगुंडी झाली.ग्रामीण वेशातील नक्षलवाद्यांनी गुरुवारच्या रात्री करेमार्का-भैरामगड दरम्यान ट्रकला थांबवले.त्यानंतर चालक आणि क्लिनरला गाडीतून बाहेर काढले.ट्रकची डिझेल टाकी फोडून ट्रकवर डिझेल शिंपडले आणि पेटवून दिला.सदरचा ट्रक महाराष्ट्रातून जगदलपूरला कांदे घेऊन जात होता.अश्यातच त्याच्या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना थांबवले.यावेळी जगदलपूरहून विजापूरला येणारी एक प्रवासी बस येत होती.या बसमध्ये अनेक प्रवासी होते.यावेळी नक्षलवाद्यांनी तब्बल अर्धा तास बस थांबवली. त्यानंतर प्रवाशांची आणि बस चालकाची चौकशी केल्यानंतर बसला सोडून देण्यात आले. घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.मात्र,नंतर नक्षलवादी बस सोडून पळून गेले.घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जवानांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली.सदरची घटना जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग ६३ वर भैरामगड पोलीस स्टेशनपासून ५ किलोमिटर अंतरावर घडली.सुदैवाने नक्षलवाद्यांनी कुणालाही काहीही केले नसले तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नक्षलवाद्यांनी डिझेल टाकी फोडून पेटवला ट्रक.. -प्रवाशांची बसही थांबवली; प्रवाशांची घाबरगुंडी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

