Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजट्रॅक्टर ट्रॉली व खांबाच्या मधोमध सापडून ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; देसाईगंज...

ट्रॅक्टर ट्रॉली व खांबाच्या मधोमध सापडून ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; देसाईगंज तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पाच वर्षीय चिमुकला
मंदिर परिसरात ठेवलेल्या ट्रॅक्टरजवळ खेळत असतांना ट्रॅक्टर चालकाच्या ध्यानात न आल्याने ट्रॅक्टर सुरू करून मागे घेण्याच्या प्रयत्नात चिमुकला ट्रॅक्टर ट्रॉली व मंदिर परिसरातील खांबाच्या मधोमध सापडून मृत्यू झाल्याची घटना देसाईगंज तालुक्याच्या  कोरेगाव येथे काल,गुरुवारी ५ जूनच्या दुपारी घडली.लक्की रवी बनपूरकर वय ५ वर्ष,रा.कोरेगाव असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
माहितीनुसार,कोरेगाव येथील रवी बनपूरकर यांचा ५ वर्षीय मुलगा घरा शेजारील शिवमंदिर परिसरात ठेवलेल्या ट्रॅक्टरजवळ खेळत होता.तितक्यातच गावातील गोविंदा ठाकरे हे ट्रॅक्टर सुरू करण्यास गेले.मात्र,त्यांना लक्की हा ट्रॅक्टरजवळ खेळत असल्याचे लक्षात न आल्याने लक्की हा ट्रॅक्टर ट्रॉली व मंदिर परिसरातील खांबाच्या मधोमध सापडला.यात लक्कीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मुत्यु झाला.घटनेची माहीती देसाईगंज पोलीसांना कळताच घटनास्थळ गाठून शव देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.त्यानंतर चीमुकल्यावर सायंकाळच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!