Sunday, August 9, 2026
Homeनागपूरअन् शेतकऱ्याला ठार करून चक्क पाठीवरच होता बसून.

अन् शेतकऱ्याला ठार करून चक्क पाठीवरच होता बसून.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील नेउरवाडा येथील एका ३८ वर्षीय शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना काल शनिवारी खैरी शिवारातील शेतात घडली.शेतकरी व त्याची पत्नी दोघेही शेतातील धुऱ्यावरील काट्या तोडत होते.पत्नी काही अंतरावर जाताच अचानकपणे आलेल्या वाघाने मागून हल्ला चढविल्याने शेतकरी रवींद्र कवडू काळसरपे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
रवींद्र हे पत्नी संगीतासह सकाळी शेतात गेले होते. त्यांनी शेतातील धुऱ्यावरील काट्या तोडणे सुरू केले.काही वेळानंतर पत्नी लगतच्या शेतात ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टरबाबत विचारणा करण्यास गेली. अशातच वाघाने रवींद्रवर मागून हल्ला केला.त्यानंतर वाघाने रवींद्रला ओढत शेताशेजारील नाला ओलांडून नाल्याच्या दुसऱ्या काठावर नेले.रवींद्रच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.नाल्याच्या काठावरील दुसऱ्या किनाऱ्यावर एक शेतकरी जात असतांना त्याला वाघ चक्क रवींद्रच्या पाठीवर बसलेला आढळला.तो जोरात ओरडताच वाघ पळून गेला.यानंतर घटनास्थळी मृत रवींद्रची पत्नी व गावातील काही शेतकरी गेले.याबाबत माहिती मिळताच पारशिवणी पोलिस घटनास्थळी पोहचले.त्यांनी आम्ही मृतदेह शेतासमोरील झाडाखाली ठेवतो असे लोकांना सांगितले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत रवींद्र यांचा मृतदेह पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेला.घटनास्थळी टप्प्याटप्प्याने ३०० लोक एकत्र आले व काहीकाळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.ग्रामस्थांनी मृतदेह परत घटनास्थळी आणण्याची मागणी पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्यानंतर शेवटी दुपारी ३ वाजता मृतदेह पुन्हा नाल्याच्या काठावर नेण्यात आला.प्रसंगी दिशाभूल करून मृतदेह नेल्याचा आरोप नागरिकांनी अधिकाऱ्यांवर केला.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यासह कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!