Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोली'याला' म्हणतात प्रत्यक्षात कृती; आरमोरीच्या स्टॅम्प विक्रेत्यांना दणका देत तिघांचे परवाने निलंबित..

‘याला’ म्हणतात प्रत्यक्षात कृती; आरमोरीच्या स्टॅम्प विक्रेत्यांना दणका देत तिघांचे परवाने निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच ‘एका स्टॅम्प पेपरवर ३ टक्के कमिशन मिळूनही अतिरिक्त रकमेची वसुली..!’ या मथळ्याखाली ‘उद्रेक न्युज’ ने २५ मे २०२५ रोजी बातमी प्रसारित केली होती.त्यानुसार सुजाण नागरिकांनी आरमोरी शहराच्या स्टॅम्प विक्रेत्यांची नुकतीच पोलखोल करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.याची दखल घेत चौकशी करण्यात आली आणि तब्बल २९ नागरिकांचे बयाण नोंदविण्यात आले.त्यांच्या बयाणानुसार आरमोरी येथील दिलीप इन्कने,जगदीश रामटेके व चंद्रभान मेश्राम हे स्टॅम्प (मुद्रांक)विक्रेते खरेदीदारांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर तिघांचेही स्टॅम्प परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
आरमोरी येथील मुद्रांक विक्रेते(स्टॅम्प विक्रेते) जास्तीचे पैसे घेऊन मुद्रांक विक्री करीत असल्याची तक्रार अण्णा हजारे विचार मंचचे जिल्हाध्यक्ष बसंतसिंग बैस, तालुकाध्यक्ष अनुरथ निलेकार,तालुका सचिव देवेंद्र ब्राम्हणवाडे,आरमोरी तालुकाध्यक्ष दिवाकर रामटेके यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी अवीश्यांत पंडा यांच्याकडे केली होती.तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी आरमोरीचे नायब तहसीलदार एच. एन.दोनाडकर यांच्याकडून मुद्रांक विक्रेत्यांची चौकशी केली.चौकशीदरम्यान मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक व तिकीट खरेदी केलेल्या एकूण २९ नागरिकांचे बयाण नोंदविण्यात आले.त्यांच्या बयाणानुसार आरमोरी येथील दिलीप इन्कने,जगदीश रामटेके,चंद्रभान मेश्राम हे मुद्रांक विक्रेते खरेदीदारांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.यात ते दोषी आढळून आले.त्यानुसार तिघांचेही मुद्रांक परवाने तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आले आहेत.
शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरची खरेदी करतो म्हटले तर कुठे ११० रुपये तर कुठे १२० रुपये मोजावे लागतात. हुज्जत घालतो म्हटले तर तुम्हाला जिथून घ्यायचे आहे,तिथून १०० रुपयांत स्टॅम्प खरेदी करा,अशी अरेरावीची भाषा अनेक स्टॅम्प विक्रेते करतांना दिसून येतात.शासनाने याचे मूल्य ठरवून दिलेले असतांनाही त्यापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते.याबाबत कुणीही तक्रार करीत नसल्याने स्टॅम्प विक्रेते मर्जीने जास्त दर आकारून स्टॅम्प पेपरची विक्री करीत असल्याचे दिसून येते.मूळ किंमतीपेक्षा जास्त दराने मुद्रांक विक्री करू नये,असा नियम आहे. त्यानंतरही स्टॅम्प व्हेंडर(मुद्रांक विक्रेते) अतिरिक्त रक्कम आकारत असल्याचे सर्वश्रुत आहे.ग्राहकही झंझट नको म्हणून जादा रक्कम देतात. स्टॅम्प विक्रेत्यांना विक्रीवर ३ टक्के कमिशन मिळते. व्हेंडरला ठरलेले कमिशन मिळत असतांना जास्तीचे पैसे कशासाठी? हा गंभीर सवाल आहे.त्यामुळे त्यांनी जास्तीचे पैसे घेऊन ग्राहकांची पिळवणूक करू नये.
अधिकाऱ्यांनी कॅबिनबाहेर निघून ग्राहकांची समस्या सोडवावी.स्टॅम्प पेपर जास्त दराने विकले जातात, अशी ग्राहकांची ओरड असूनही कारवाई मात्र शून्यच. अधिकारी म्हणतात,लेखी तक्रार केल्यास नक्कीच कारवाई करू,अश्या आशयाची बातमी उद्रेक न्युज’ ने प्रसारित केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!