- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोरची(गडचिरोली):-दुचाकीस्वार पती-पत्नी कोरची तालुक्यातील झगडवाही येथे जात असतांना वाटेतच कोरची-कुरखेडा मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक बसताच दुचाकीस्वार पती-पत्नी खाली कोसळले.यात पत्नीच्या अंगावरून ट्रक गेल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला तर पतीचा एक पाय तुटला असल्याची घटना आज,शनिवार ३१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.घटना घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.रेवता राजाराम उसेंडी वय ६० वर्षे रा.जामटोला,ता.कोरची असे मृतक पत्नीचे नांव असून राजाराम उसेंडी वय ६५ वर्षे असे अपघातातील गंभीर जखमीचे नाव आहे.
माहितीनुसार,राजाराम उसेंडी व पत्नी रेवता हे दोघेही दुचाकी क्रमांक-एमएच३३ ए ६४२५ ने झगडवाही येथील नातेवाईकाची प्रकृती बघण्यासाठी जात होते.अशातच कोरची मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर कोरची-कुरखेडा मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर कोसळले.यात रेवता यांच्या शरीरावरून ट्रक गेल्याने शरीराचा पूर्ण चेंदामेंदा झाला व राजाराम यांचा पाय पूर्णपणे तुटून गंभीर दुखापत झाली.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र,रुग्णवाहिका न आल्याने राजाराम उसेंडीला तातडीने खासगी वाहनाने कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचारा नंतर पुढील उपचाराकरिता गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
- Advertisement -

