Tuesday, April 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली 'नाट्यश्री' तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन... - कवी संमेलनात जास्तीत-जास्त कवींनी...

गडचिरोली ‘नाट्यश्री’ तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन… – कवी संमेलनात जास्तीत-जास्त कवींनी भाग घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने निरनिराळे साहित्यिक तथा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच एक भाग म्हणून येत्या १८ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक,गडचिरोली येथील सभागृहात राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.कवी संमेलनात भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून विषयाचे बंधन नाही. तथापि,कविता ही एखाद्या समाजावर, धर्मावर, व्यक्तीवर, राजकीय परिस्थितीवर टिका करणारी किंवा कुणाची मानहानी करणारी व अराजकता माजविणारी नसावी. नवोदित व प्रस्थापित कवींना मंच उपलब्ध करून देणे हा ‘नाट्यश्री’ चा उद्देश आहे.तरी जास्तीत जास्त कवींनी भाग घेण्याचे आवाहन कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे,अरुण बुरे व साहित्यिक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी केले आहे.स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या कवींनी १५ तारखेच्या आत चुडाराम बल्हारपुरे यांचे भ्रमणध्वनी क्र.९६२३६६३४३५(9623663435) वर संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार...

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!