- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशात अनेक मोठ-मोठे अधिकारी बनलेत.अनेकांच्या जीवनातील स्टोऱ्या वेगवेगळ्या आहेत.कुणी मिळेल ते काम करून अभ्यास केला,तर कुणी शेळ्या-मेंढ्या राखून,काहींनी गरिबी काय असते हे जवळून बघितले आहे.तर काहींना गरिबीची जाणच नसल्याने असे केवळ पदाचा रुबाब झाडतांना दिसून येतात.अशातच उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील उत्कर्ष श्रीवास्तव यांनी नुकतीच यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात ऑल इंडिया रैंक ४९८ मिळवली आहे.
उत्कर्ष श्रीवास्तव यांनी दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातून राजकारणशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली.त्यातच त्यांचे शालेय शिक्षण गोरखपूरमध्येच झाले.पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यूपीएससीच्या परीक्षेची तयारी केली.तयारी करीत असतांनाच त्यांना एक मुलगी पसंत आली.हळूहळू प्रेम बहरू लागले.प्रेम -प्रकरण सुरू असतांनाच उत्कर्ष यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या.मात्र,त्यात त्यांना अपयश आले.त्यामुळे प्रेयसीने त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला.अशातच उत्कर्ष यांनी तिला विनवणी करून थांबविण्याचा व बोलण्याचा प्रयत्न केला,मात्र ती तरुणी त्यांना कायमची सोडून गेली.एखादेवेळी आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो, अशी व्यक्ती अचानकपणे सोडून गेल्यास आभाळ फाटल्यासारखे होते.पण उत्कर्ष यांनी स्वतःला सावरुन आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले आणि एक दिवस उजळला.यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि उत्कर्ष श्रीवास्तव यांनी नुकत्याच यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून ऑल इंडिया रैंक ४९८ मिळवली व त्यांची आयपीएस अधिकारीपदी निवड झाली.
- Advertisement -

