Saturday, June 27, 2026
Homeमुंबईदहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना मिळणार ५० लाखांची आर्थिक मदत.. - रोजगार आणि...

दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना मिळणार ५० लाखांची आर्थिक मदत.. – रोजगार आणि शिक्षणाची जबाबदारीही उचलणार राज्य सरकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे मंगळवारी २२ एप्रिलला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैसरन मैदानावर सैनिकी गणवेशात येत दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारत शिवीगाळ केली आणि घोडेस्वारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला.झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यात महाराष्ट्रातील ६ जण मृत्यूमुखी पडलेत.डोंबिवलीतील ३,पुण्यातील २ व पनवेल येथील एकाचा समावेश आहे.बैसरन व्हॅली हे पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी फक्त घोड्याने किंवा पायीच जाता येते.दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आनंद लुटण्यासाठी भेट देत असतात.गोळीबाराची घटना अशावेळी घडली,ज्यावेळी पर्यटक मोठ्या प्रमाणात होते.अशातच आता दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,मंगळवार २९ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. त्यानुसार बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच पीडित कुटुंबातील व्यक्तींची रोजगार आणि शिक्षणाची जबाबदारी देखील राज्य सरकारच्या वतीने उचलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पीडित जगदाळे कुटुंबातील आसावरी जगदाळे हिला नोकरी देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.या बरोबरच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत झालेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे विविध मंत्री देखील उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!