- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काल,गुरुवारी १७ एप्रिल रोजी उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यामुळे चोवीस तासांत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.उत्तर प्रदेश-बिहारसह अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपले.उत्तर प्रदेशातील अयोध्येत ६,बाराबंकीमध्ये ५ आणि अमेठी आणि बस्तीमध्ये प्रत्येकी १ जण वीज कोसळून आणि वादळामुळे मृत्युमुखी पडले.परत आज,शुक्रवारी उत्तर प्रदेशातील ३७ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशात दोन आणि पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्याने २४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे.जम्मू-काश्मीर, लडाख,हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- Advertisement -

