Friday, August 28, 2026
Homeकोरचीआज कोरचीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक संपन्न.. -गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना...

आज कोरचीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक संपन्न.. -गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये- आमदार रामदास मसराम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-सध्या स्थितीत विदर्भासह संपूर्ण राज्यात लखलखत्या उन्हामुळे पाणीटंचाईचे संकट उभे येऊन ठाकले आहे.पाणी हे जीवन असल्याने जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये,याकरीता संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देत,स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठका सुरू केल्या आहेत.अशातच आज,गुरुवार १७ एप्रिल रोजी आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरची तहसील कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली
सदर बैठकीस तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतींचे सरपंच,ग्रामसेवक उपस्थित होते.त्याचप्रमाणे कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डम,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश फाये,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल,नगराध्यक्ष हर्षलताताई भैसारे,माजी जि.प.सदस्य रामसुराम काटेंगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये यांच्यासह अनेक मान्यवर,अधिकारी तथा पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता गेडाम,सिंचाई विभागाचे उपकार्यकारी अभियंता मरसकोल्हे,विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता वांढरे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष धनिराम हिडामी,माजी सरपंच तुलाराम मडावी,जीवन नुरुटी,जगदीश काटेंगे,दानशूर हलामी,मोहन कुरचाम , दामेसाय कोवाची यांची देखील उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान विविध गावांतील जलस्त्रोत,बंद पडलेल्या विहिरी,नादुरुस्त बोरवेल्स,टँकरने पाणीपुरवठा तसेच शासनाच्या जलसंधारण योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रसंगी आमदार मसराम म्हणाले की,एकाही गावातील नागरिकांना  पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये,याची विशेष खबरदारी घेण्यात यावी.यावेळी काही ग्रामपंचायत प्रतिनिधींनी आपल्या गावातील समस्या मांडल्या असता,आमदारांनी त्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.बैठकीचा उद्देश केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणे आहे,असे आमदार मसरामांनी स्पष्ट केले.
विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभारावर आमदारांनी व्यक्त केली नाराजी👇
मागील काही दिवसांपासून कोरची तालुक्यातील नागरिक विद्युत पुरवठा अनियमतमुळे त्रस्त झाले असून शेतकऱ्यांच्या पिकाला सुद्धा याचा फटका बसत आहे.सतत विजपुरवठा खंडित व कमी दाबाच्या विद्युत सेवेमुळे पीक करपू लागले आहेत.त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करून कोरची तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा,असे आदेश उपकार्यकारी अभियंता सुमीत वांढरे यांना दिले असून विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभारावर आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!