Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएकाच झाडाला दोघा मित्रांनी घेतला गळफास..

एकाच झाडाला दोघा मित्रांनी घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एक २५ वर्षीय युवक व ३० वर्षीय युवकाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,शनिवार १२ एप्रिलला पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.तुषार ढगे वय २५ वर्षे, व सिकंदर शेख वय ३० वर्षे दोघेही रा.हुंडा पिंपळगाव, ता.जामखेड,जि.अहिल्यानगर(पूर्वीचे नाव अहमदनगर) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत.दोघेही चांगले मित्र असून त्यांनी टोकाचे पाऊल कां उचलले? याचा तपास एमआयडीसी भोसरी पोलिस प्रशासन करीत आहेत.पोलीस सूत्रांनुसार,दोघेही मित्र काल,शुक्रवारी पुण्यात काही कामानिमित्त गेले होते.त्यातच पिंपरी चिंचवड येथील मोर्शी भागातील भारतमाता चौक खिरीड वस्ती भागात आज शनिवारी दोघांनीही एका झाडाला एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच घटनेची माहिती लगेच एमआयडीसी भोसरी पोलिसांना  देण्यात आली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!