- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.आदिवासिंना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन-प्रशासन युद्ध स्तरावर प्रयत्न करीत असतांना अहेरीत तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये अधीक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांना काठीने व चप्पलने मारहाण करण्याचा अमानविय प्रकार उघडकिस येताच वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा प्रभारी प्रा.हितेश मडावी यांनी गडचिरोलीचे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन सबंधित अधिक्षकावर गुन्हा दाखल करुन सेवेतुन बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
अहेरीच्या एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमधील वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या आदिवासी विद्यार्थ्याला अधिक्षक पदावर कार्यरत असलेल्या इश्वर शेवाळे यांनी आपल्या शरीराची मालिश करण्यास सांगितले विद्यार्थी जोर लावुन मालिश करत नसल्याने संतापलेल्या अधिक्षक इश्वर शेवाळे याने शिविगाळ करत चपलेने बेदम मारहान केली.तसेच २५ मार्च रोजी दुपारी जेवणानंतर काही मुले आपल्या खोलीत जाऊन झोपली होती.यावेळी वसतिगृह अधीक्षक ईश्वर शेवाळे याने त्यांना काठीने व चप्पलने मारहाण केली.यानंतर एका विद्यार्थ्यास अभ्यास करताना स्टडी रूममध्ये झोप लागली.त्यालादेखील चप्पल व काठीचा मार देण्यात आला.चार ते पाच विद्यार्थ्यांनी याबाबत नातेवाइकांना कळविल्यानंतर २७ मार्च रोजी सदर प्रकार उघडकीस आला.विद्यार्थ्यांच्या शरिरावर मारहाणीचे
अनेक व्रण उमटले आहेत.अतिदुर्गम भागातील आदिवासी समुहाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असतांना आदिवासी विद्यार्थ्यांना अमानविय पद्धतिने केलेली मारहाणीची घटना अतिशय निंदनिय तथा माणुसकीला काळिमा फासणारी असुन अश्या अघोरी कृत्य करणाऱ्या वसतिगृह अधिक्षक ईश्वर शेवाळे याचेवर नोंद नोंद करुण सेवेतुन तात्काळ बडतर्फ करावे,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली-चिमुर क्षेत्राचे प्रभारी प्रा.हितेश मडावी यांनी गडचिरोली निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.याप्रसंगी वंचितचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे,चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रेम जगझाके,उषा निमगडे,सोनलदिप देवतळे,पियुष सडमाके,संतोष खोब्रागडे,भाविता गेडाम यांचेसह वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -

