Saturday, April 18, 2026
Homeगोंदियामोहफुल संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाचा हल्ला; १५० मीटरपर्यंत नेले फरफटत..

मोहफुल संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाचा हल्ला; १५० मीटरपर्यंत नेले फरफटत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील
गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय आणि वन विकास महामंडळ(एफडीसीम)अंतर्गत येणाऱ्या शिवरामटोला जवळील कक्ष क्रमांक-३३२ जंगल परिसरात काल, रविवार २३ मार्चला सकाळच्या सुमारास मोहफुल संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेला पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.अनुसया धानु कोल्हे वय ४५ वर्षे,रा.शिवरामटोला असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे.
हल्ली मोहफुल संकलनाचा हंगाम सुरू झाला आहे.अशातच काल रविवारी सकाळच्या सुमारास
शिवरामटोला येथील काही नागरिक मोहफुल संकलन करण्याकरिता जंगल परिसरात गेले होते.मोहफुल संकलन करीत असतांना दबा धरून बसलेल्या पट्टीदार वाघाने अनुसया कोल्हे हिच्यावर अचानकपणे हल्ला चढवला.वाघाने हल्ला करताच बाजूला असलेले बैल जोरजोराने ओरडू लागल्याने जवळच असलेल्या नागरिकांना काहीतरी घडले असावे असे संकेत  आल्याने लगेच आवाजाच्या दिशेने त्यांनी धाव घेतली असता वाघ अनुसया कोल्हे यांना फरफटत नेत असल्याचे दिसले.यावर काही नागरिक परत गावात आले व संपूर्ण माहिती दिली.यावर संपूर्ण गावकरी
घटनास्थळी जमा झाले.वाघाने अनुसया कोल्हे यांना १०० ते १५० मीटरपर्यंत फरकटत नेले आणि वाघ दोन तास मृताजवळ ठाण मांडून बसला असल्याने लोकांना त्या नरभक्षी वाघाला बघता आले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.अनुसया यांचा मृतदेह फरफटत नेल्यानंतर वाघ मृतदेहा जवळच ठाण मांडून बसून होता.याबाबत माहिती मिळताच गोठणगावचे
वनपरिक्षेत्राधिकारी पवार यांनी रेस्क्यू टीमला बोलावून घेतले.रेस्क्यू टीममध्ये एनएनटीआरची टीम,साकोली येथून डॉ.मेघराज तुलावी,हेड कॉन्स्टेबल पराग भुते, आशिष रामटेके,कैलास झोडे,नूतन भंडारकर तर गोंदिया येथील रेस्क्यू टीममध्ये अमोल चौबे,सतीश बेंद्रे,विक्रांत ब्राह्मणकर,शुभम मेश्राम,राकेश ढोक,टिंकू डोंगरवार,दिनेश सोनटक्के,पृथ्वी सयाम यांच्या समावेश होता.टीमला तब्बल चार तासांनी वाघाला जेरबंद करण्यात यश आले.यासाठी हिरवळ बहुउद्देशीय संस्थेचे रुपेश निंबार्ते, छत्रपाल चौधरी व आशिष दुबे यांचेही सहकार्य लाभले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!