Saturday, May 30, 2026
Homeमुंबईसगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही- अजित पवार...

सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही- अजित पवार – लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी करावी लागणार दीर्घ प्रतीक्षा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे.पैश्याची जुळवाजुळव कशी करावी,याकडे सरकारचे लक्ष लागले आहे.अशातच सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही.त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल,असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल गुरुवारी विधानसभेत केले.या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.लॉटरीच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न वाढावे यासाठी विधानसभा सदस्यांची समिती नेमण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली.विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील वित्त,नियोजन,अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या.तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देतांना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत.त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ,असे त्यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!