Tuesday, September 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या.. - कुरखेडा उपविभागीय अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती..

राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या.. – कुरखेडा उपविभागीय अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सत्ता पालट तर अधिकारीही पालट होणे साहजिकच आहे.त्याचा तो अधिकारी व माझा हा अधिकारी अशी वर्तमानस्थिती झाली आहे.त्यामुळे याला कुठलाही तोड नाहीच,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशातच आता राज्यातील सहा आयएएस(सनदी अधिकार) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.बदल्यांचे सत्र हा न संपणारा विषय असल्याने आज,मंगळवारी १८ मार्चला गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा उपविभागीय अधिकारी रणजित मोहन यादव यांना प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प( ITDP)गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.रणजित यादव हे २०२२ मधील आयएएस अधिकारी आहेत.
मीनल करनवाल –मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
अंकित – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.हे २०१९ मधील आयएएस अधिकारी आहेत.
आंचल गोयल – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नागपूर यांची मुंबई शहर मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१४ मधील आयएएस अधिकारी आहेत.
कवली मेघना – प्रकल्प संचालक आयटीडीपी,किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपविभाग नांदेड यांची जिल्हा परिषद नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०१९ आयएएस अधिकारी आहेत.
करिश्मा नायर – प्रकल्प संचालक,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP)जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग पालघर यांची नाशिक महानगरपालिका नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या २०२१ मधील आयएएस अधिकारी आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!