Sunday, July 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने अपघात; दोन भाविकांचा मृत्यू तर १२ जण जखमी..

चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने अपघात; दोन भाविकांचा मृत्यू तर १२ जण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या चारचाकी वाहनाचा वाटेतच टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन मार्गावर उलटले.अशातच त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाल्याची घटना आज,शनिवारी ८ मार्चला सकाळच्या सुमारास बुलढाण्यात घडली.विद्याबाई साबळे वय ५५ वर्षे,मोतीराम बोरकर वय ६० वर्षे दोघेही रा.आसेगाव देवी,ता.बाभुळगाव, जि.यवतमाळ अशी अपघातात मृत पावलेल्या भाविकांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की,यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी येथील १४ भाविक क्रूझर गाडीने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते.मात्र,बुलढाण्यातील माळसावरगाव येथील मुंबई कॅरिडोरच्या पॉईंटजवळ त्यांच्या वाहनाचा टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन महामार्गावर उलटली.यादरम्यान,मागून भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा कारने क्रूझरला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की,गाडीतील १४ ही जण दाबल्या गेले.यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले.जखमींमध्ये तिघांची प्रकृती खालावली आहे.भक्ती राऊत वय ५ वर्षे,रमेश राऊत वय ४० वर्षे,मीरा राऊत वय ६० वर्षे,छायाबाई चव्हाण वय ६५ वर्षे,प्रमिला घाटोळ वय ६० वर्षे, भावना रमेश राऊत वय ३० वर्षे,संतोष साखरकर वय २८ वर्षे,बेबीबाई येलोत वय ६० वर्षे,कमला जाधव वय ५५ वर्षे,सुशिला जाणार वय ५२ वर्षे,प्रतिभा अरुण वाघोडे वय ४५ वर्षे,मीरा गोटफोडे वय ६५ वर्षे अशी जखमींची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच सिंदखेडराजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह बाहेर काढून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!