Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त"शेतकरी नवरा नको गं बाई" म्हणणाऱ्यांना मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला?

“शेतकरी नवरा नको गं बाई” म्हणणाऱ्यांना मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लग्नाची वय झाली,पण मुलगीच मिळेना..! अनेक तरुणांची वय घसरत चालली आहे.मुलीकडील घरच्यांच्या अपेक्षा वाढत असल्याने काय करावे? असा प्रश्न मुलाकडील घरच्यांना पडला आहे.अशातच आता शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे.यात आता ठराविक उत्पन्नाची हमी राहिली नाही.त्यामुळे शेतकरी नवरा नकोच,अशी धारणा होऊ लागल्याने शेती करणाऱ्या वराला आता मुलगी मिळणे कठीण झाले आहे.एकीकडे “शेतकरी नवरा नको गं बाई” म्हणणाऱ्या वधूला व वधूच्या नातेवाइकांना नोकरीवर असलेल्या मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
पूर्वीच्या काळ बघितला तर ‘उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असा समज होता.कालांतराने चक्रच बदलले आणि उत्तम नोकरी,तर कनिष्ठ शेती  ठरली आहे.या दहा वर्षाच्या काळात शेतीचे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत बरेच कमी झालेले आहे.उत्पन्न जरी सरासरी एवढेच होत असेल,तरी मिळणारा बाजार भाव व लागत मूल्य यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मिळणारा नफा हा फारच कमी असून, कधीकधी शेती तोट्यातही जाते.आजची परिस्थिती अशी आहे की,ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींनाही आज शहरात नोकरी करणारा मुलगा हवा आहे.मुंबई,पुणे यांसारख्या शहरात नोकरी असलेला,तसेच एक स्वतंत्र फ्लॅट असलेला मुलगा आज मुलींना हवा आहे.परंतु गावखेड्यातील शेतात राबणारा मुलगा मुलींना नकोसा झालेला आहे.शेतकरी मुलाला मुलगी दिल्यास आपली मुलगी सुखात राहणार नाही.उन्हातान्हात कामे करावी लागतील,या काळजीने पालकही मुलगी द्यायला तयार होत नाही.मात्र,नोकरी करणाऱ्या मुलाकडे शेती आहे की नाही हे विचारले जाते. जन्मदर तफावत व मुली उच्चशिक्षित असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!