Monday, July 27, 2026
Homeगोंदियाशासकीय रकमेचा अपहार प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह दोन वनक्षेत्र सहाय्यकांवर निलंबनाची कारवाई...

शासकीय रकमेचा अपहार प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह दोन वनक्षेत्र सहाय्यकांवर निलंबनाची कारवाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-रोपवन लागवडीच्या कामात अनियमितता तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी न पडलेल्यांची नावे दाखवून पैसे हडप करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह दोन वनक्षेत्र सहाय्यकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा वनपरिक्षेत्रात उघडकीस आल्याने जिल्ह्याच्या वनविभागात एकच खळबळ माजली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.मून,वनक्षेत्र सहाय्यक शैलेंद्र पारधी व वनक्षेत्र सहाय्यक अब्दुल शकील अब्दुल दुरानी असे निलंबित करण्यात आलेल्या वनाधिकाऱ्यांची नावे आहेत.माहितीनुसार,गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील वनपरिक्षेत्रात मागील वर्षाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रोपवन लागवडीची कामे करण्यात आली होती.त्यातच रोपवन लागवड कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात हल्ले न झालेल्यांची नावे दाखवून संगनमत करून तिघांनीही अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह दोन वनक्षेत्र सहाय्यकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांनी स्पष्ट केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!