उद्रेक न्युज वृत्त :-देशातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून ९.८ कोटी शेतकऱ्यांना येत्या सोमवारी २४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना १९ वा हप्ता जारी करतील.या अंतर्गत,सुमारे २२,००० कोटी रुपये हस्तांतरित केले जातील.केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती सार्वजनिक केली आहे. चौहान म्हणाले,की २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथी एका कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी पीएम किसानचा १९ वा हप्ता जारी केला करतील. सदरची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. फेब्रुवारी २०१९ मध्ये लाँच करण्यात आलेली पीएम किसान ही जगातील सर्वात मोठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना आहे.या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत झाली आहे.पीएम-किसान योजनेअंतर्गत,प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो.
येत्या सोमवारी पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

