- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एका ४३ वर्षीय दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने उत्तर गोव्यातील सिओलीम गावातील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,सोमवार ३ फेब्रुवारीला उघडकीस आली.केपी चौधरी उर्फ सुनकारा,शंकर कृष्ण प्रसाद चौधरी वय ४३ वर्षे असे आत्महत्या केलेल्या चित्रपट निर्मात्याचे नाव आहे.
के.पी.चौधरी याने रजनीकांत यांच्या प्रसिद्ध कबाली चित्रपटासह विविध हीट चित्रपटांची निर्मिती केली आहे.यात गब्बर सिंग,अर्जुन सुरावरम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमने केपी यांना २०२३ मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.चौधरी यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याची चर्चा सुरू आहे.कोरोना कालावधीत आर्थिक चणचण जाणवत असल्याने ड्रग्ज व्यवसायात गुंतून ड्रग्जच्या आहारी गेल्याने सर्वकाही गमावून बसले होते.त्यातच काही कालावधीपासून गोव्यात वास्तव्यास आलेल्या केपी चौधरी याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले अद्यापही स्पष्ट नसल्याने अंजुना पोलीस ठाण्याच्या सिओलीम चौकीला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
- Advertisement -

