Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविद्युत वितरण कंपनीकडून दर कपातीचा प्रस्ताव.. - राज्यातील दोन कोटींपेक्षा जास्त वीज...

विद्युत वितरण कंपनीकडून दर कपातीचा प्रस्ताव.. – राज्यातील दोन कोटींपेक्षा जास्त वीज ग्राहकांना होणार लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात घरगुती तसेच औद्योगिक वीज वापराचे दर जास्त असल्याने वीज बील भरमसाठ येऊन विद्युत बील भरण्यास अनेकांची दमछाक होत असते.अशातच आता महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव सादर केला आहे.या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास साधारणपणे १ ते १५ टक्के वीजदर कपात होणे अपेक्षित आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन कोटींपेक्षा जास्त वीज ग्राहकांना मिळणार आहे.या प्रस्तावानुसार २०२५ – २६ ते २०२९-३० या कालावधीमध्ये १२ ते २३ टक्के दर कपात होईल.राज्यामध्ये १०० पेक्षा कमी युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांना १५ टक्के दर कपातीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.ही दर कपात २०२५-२६ या कालावधीत लागू होईल.तर त्या पुढील काळात २०२७-२८ मध्ये १०० पेक्षा कमी युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांना १९ टक्के दर कपात लागू होईल.तर २०२८-२९ मध्ये २५ टक्के दर कपात करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.सध्या प्रत्येक वीज ग्राहकाला युनिट मागे ५ रुपये १४ पैसे द्यावे लागतात.या प्रस्तावानुसार २०२९-३० मध्ये त्याच ग्राहकांना प्रत्येक युनिट मागे २ रुपये २० पैसे द्यावे लागतील.त्यामुळे हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!