Saturday, June 20, 2026
Homeनागपूररस्ता ओलांडतांना ट्रकची धडक; वृध्द महिला जागीच ठार..

रस्ता ओलांडतांना ट्रकची धडक; वृध्द महिला जागीच ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रस्ता ओलांडत असतांना समोरून येणाऱ्या ट्रकने धडक देताच ७४ वर्षीय वृध्द महिला खाली पडून अंगावरून ट्रक गेल्याने ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास नागपूर शहरातील वाठोडा दहन घाट चौकात घडली.सुमन गजानन ठाकरे वय ७४ वर्षे,गजानन नगर,वाठोडा लेआऊट नागपूर असे अपघातात मृत पावलेल्या वयस्क महिलेचे नाव आहे.
प्रत्यक्ष दर्शिंच्या मते,वृध्द महिला वाठोडा दहन घाट चौकातून पलीकडचा रस्ता ओलांडत होती.रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.धडक बसल्याने खाली कोसळून ट्रक अंगावरून गेला,त्यातच ती गतप्राण झाली. गतप्राण होताच ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळावरच ठेऊन पोबारा केला.सदरची घटना घडताच नागरिकांचा एकच जमाव झाला.घटनेची माहिती पोलिसांना होताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला.त्यानंतर ट्रक ताब्यात घेत पुढील तपास वाठोडा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!