- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा मानला जातो.तरीही पैश्याची हाव ही सुटलेली नाही; राज्यात अनेकांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.तरी सुद्धा कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.अश्याच प्रकारे आयटीआयमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खासगी कंपनीच्या संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.बजाजनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खामला रोडवरील एलआयसी कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली.नंदकिशोर पंजाबराव गवारकर असे आरोपीचे नाव आहे.तो अभिजित इंटेलिजन्स सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर कंपनीचा संचालक आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडमधील शासकीय आयटीआयमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे.या नियुक्तीचे काम गवारकरच्या कंपनीला देण्यात आले आहे.त्या बदल्यात कंपनीला निश्चित शुल्क दिले जात होते.गवारकर काही दिवसांपासून उमेदवारांची निवड करत आहे.त्याने एका अर्जदाराला क्राफ्ट डायरेक्टर पदावर नियुक्ती मिळवून देण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची मागणी केली. एका महिलेला स्वच्छता कर्मचारी पदासाठीच्या नियुक्तीपत्राच्या बदल्यात १० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले.पीडितेने याबाबत एसीबीकडे तक्रार केली.तक्रारीची पुष्टी झाल्यानंतर एसीबीने गवारकरला अटक करण्यासाठी सापळा रचला.त्याला कार्यालयातून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानुसार बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

