- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-अनेकदा अभयारण्यात वाघ,बिबट्,वाघीण तसेच विविध प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते.केव्हा-केव्हा तर बुकिंग हाऊसफुल झालेली असते.अशातच पर्यटकांसाठी सर्व दारे खुले असतांनाच अभयारण्य वा राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांकडून काही निर्बंध लादले जातात.याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते.त्यातच नागपूर जिल्ह्यातील उमरेड करांडला अभयारण्यात एक वाघीण आणि तिच्या पाच पिल्लांना पर्यटकांच्या जिप्सींनी घेराव घातलेला होता.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने सदर प्रकरण चांगलेच भोवले आहे.या प्रकरणी चार जिप्सी चालक व पर्यटकांचे चार मार्गदर्शक गार्ड यांना निलंबित करण्यात आले आहे.प्रत्येक जिप्सी चालकाला २ हजार ५०० रुपये तर मार्गदर्शक यांना प्रत्येकी ४५० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.गेले काही दिवस उमरेड करांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वार परिसरात ही वाघीण आणि तिचे पिल्ले पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.यावेळी देखील तिचे दर्शन झाल्याने छायाचित्र काढण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ सुरू होती. यातूनच वाघिणीला या वाहनांनी गराडा घातला होता.या चालकांवर आठवडाभर कालावधीसाठी हे निलंबन असणार आहे.
- Advertisement -

