Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीमानधन तर वाढविले,पण मिळणार कधी?ग्रामरोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत..

मानधन तर वाढविले,पण मिळणार कधी?ग्रामरोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यातील ग्रामीण भागात गावकरी मजुरांना काम उपलब्ध करून देत तुटपुंज्या मानधनावर राब-राब राबून संसाराचा गाडा हाकणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे.गत अनेक वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित होत्या.त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून रोजगार सेवकांनी सातत्याने मोर्चे,आंदोलन करीत शासनाचे उंबरठे झिजविले.अखेर ऑक्टोंबर महिन्यामध्ये राज्य सरकारने ग्राम रोजगार सेवकांना ८ हजार रुपये मानधन,तर दोन हजार रुपये प्रवास भत्ता देण्याची घोषणा केली.मात्र,तीन महिने लोटूनही रोजगार सेवकांना मानधन मिळाले नसल्याने मानधन तर वाढविले,पण मिळणार कधी? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
राज्यामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमध्ये २००८ मध्ये ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली.सुरुवातीच्या काळात ग्रामरोजगार सेवकांना तुटपुंजे मानधन देण्यात येत होते.परंतु,नंतर मागील दहा ते पंधरा वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील रोजगार सेवकांनी तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला.मात्र,प्रदीर्घ लढा लढल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोंबर २०२४ मध्ये राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रवास भत्ता देण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील रोजगार सेवकांच्या मेळाव्यात घोषणेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.अशातच अजून पर्यंत मानधन तर वाढविले,पण मिळणार कधी? अशी अवस्था झाली आहे.
राज्यात जवळपास २७ हजार ग्रामरोजगार सेवक कार्यरत आहेत.राज्यातील विविध जिल्ह्यात शेकडोच्यावर ग्रामरोजगार सेवक असून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.अशातच
रोजगार उपलब्ध करून देणारेच ‘उपाशी अन् बाकीचे तुपाशी’ असल्याचे दिसून येत आहे.वेळोवेळी यासंदर्भात मागणी करण्यात येत असली तरी अद्यापही मानधन मिळत नसल्यामुळे ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!