Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील महिलेने नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी उचलले टोकाचे पाऊल.. - पुलावरुन...

कोंढाळा येथील महिलेने नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी उचलले टोकाचे पाऊल.. – पुलावरुन उडी घेतलेल्या महिलेचे देसाईगंज पोलिसांनी वाचविले प्राण… – सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप आगरकर यांची प्रशंसनिय कामगिरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच काल,बुधवार १ जानेवारी २०२५ रोजी सर्वत्र नवीन वर्षाचा उत्सव साजरा होत असतांना कोंढाळा येथील एका विवाहित महिलेने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.नेहा कुलदिप मेश्राम वय २८ वर्षे रा.कोंढाळा, ता.देसाईगंज असे पुलावरून उडी मारलेल्या महिलेचे नाव आहे.
नविन वर्षाची सुरुवात होतांना देसाईगंज शहरासह परिसरात अनुचित घटना घडु नये; यासाठी देसाईगंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप आगरकर हे आपल्या ताफ्यासह देसाईगंज शहराच्या
विर्शी टी-पॉईंट परिसरात सायंकाळच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते.अशातच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आगरकर यांना देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरुन महिलेने उडी घेतल्याची मोबाईल फोन वरुन माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता संदिप आगरकर ताफ्यासह नदिपात्राजवळ पोहचले.नदिच्या पाण्यात एक महिला वाचवा-वाचवा अशी ओरडत असतांना आगरकर स्व:ता पाण्यात उतरले,त्यांनी महिलेला पाण्याबाहेर काढुन पोलिस गाडीत टाकले व तातडीने ग्रामिण रुग्णालय देसाईगंज येथे दाखल करीत रुग्णालयाचे डॉ.ईकबाल बेग यांनी सदर महिलेवर उपचार सुरु केले.सदर महिलेची ओळख पटल्याने पोलिसांनी तिचे पती कुलदीप मेश्राम यांस सदर घटनेची माहिती देऊन रुग्णालयात बोलावुन घेतले.सदर महिलेच्या कंबरेला व पायाला इजा झाल्याने पुढिल उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
नदिपात्रात उडी घेतलेल्या महिलेस पाण्याबाहेर काढतांना देसाईगंज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप आगरकर यांचेसह पोलीस हवालदार जिवन हेडाऊ,दिनेश राऊत,विलास बालमवार,मोरेश्वर चन्ने,जस्पाल चावला,पंकज मेश्राम यांनी मदत केली.आगरकर तथा देसाईगंज पोलिसांनी घडविलेल्या मानुसकीच्या दर्शनाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे.सदर प्रकरणाचा तपास कुरखेडा उपविभागिय पोलिस अधिकारी रविन्द्र भोसले तथा देसाईगंज पोलिस निरिक्षक अजय जगताप यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप आगरकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!