- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-नव्या वर्षाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.सर्वत्र नववर्षाची धामधूम आणि उत्साह दिसून येत आहे.राज्यभरात कुठेही मद्याच्या धुंदीत वाहन चालविल्यास तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांना जेलची हवा खावी लागेल,असा इशारा पोलिस महासंचालक कार्यालयाने दिला आहे.
थर्टी फर्स्ट म्हटले की,पोलिसांसमोरील आव्हानेदेखील वाढतात.थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या उत्साहाच्या भरात अनेकदा काही गुन्हेगारी घटनादेखील घडतात. मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे या काळात अपघातांची संख्यादेखील मोठी असते.अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे.
रेकॉर्डवरील आरोपी आहेत,त्यांची चेकिंग सिस्टम आणि त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनही करण्यात येत आहे.
पोलिसांसोबतच ट्राफिक पोलिसांची तयारीदेखील पूर्ण झाली आहे.गर्दीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त असणार आहे.जास्त अंधार असेल त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे.प्रत्येक पोलिस ठाणेअंतर्गत मोठ्या प्रमाणात महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदार आहेत.त्यांनादेखील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात करण्यात येणार आहे.गर्दीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त असणार आहे.
- Advertisement -

