- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-म्हणतात ना की,प्रेमासाठी वाट्टेल ते..! असाच काहीसा प्रकार काल,मंगळवारी १७ डिसेंबरला कोंढाळी ता.काटोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांजरा (गोविंद) येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने अल्पवयीन प्रेयसीने रागाच्या भरात अंगावर टारपिन ओतून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याने कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.कशीश विठ्ठलराव येडमे वय १६ वर्षे,रा.पांजरा गोविंद, ता.नागपूर ग्रामीण,असे मृत प्रेयसीचे नाव आहे.
ती नागपूर-अमरावती महामार्गावरील आठवा मैल येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीत वाणिज्य शाखेत शिकायची.तिचे साहिल नागोराव कुडमते वय २४ वर्षे,रा.खडगाव, वाडी,ता.नागपूर ग्रामीण या तिच्या नात्यातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मोबाइल फोनमधील फोटोमुळे या प्रेमसंबंधाची माहिती तिचा आतेभाऊ आकाश टेकाम याला मिळाली होती.तिला साहिलसोबत लग्न करायचे होते.साहिलने लग्न करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी येडमे कुटुंबीयांना काल मंगळवारी ठाण्यात बोलावले होते. सर्वजण सकाळी ११ वाजेच्या सुमारास ठाण्यात गेले.त्यावेळी कशीश तिची मामी अनिता रवींद्र टेकाम हिच्यासोबत घरी होती.तिने मामीला घरी पाठविले आणि खोलीत बंद करून घेत अंगावर टारपिन ओतून घेत स्वतःला जाळून घेतले.घरातून धूर निघत असल्याने शेजाऱ्यांनी दार तोडून तिच्या अंगावर पाणी टाकले.तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.माहिती मिळताच ठाणेदार राजकुमार त्रिपाठी,उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी प्रियकर साहिल कुडमते याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रियकर फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
कशीशच्या आई-वडिलांनी तिला मोबाइल फोन विकत घेऊन दिला नव्हता.घरी कुणीही नसल्याने आकाशला घरी झोपण्यासाठी बोलावले होते.त्याचवेळी तिच्याकडे मोबाइल फोन असल्याचे आकाशच्या निदर्शनास आले.त्याने फोन तपासला असता,त्यात साहिलचे तिच्यासोबत असलेले फोटोही दिसले.तो फोन तिला साहिलने भेट दिला होता.याच फोनमुळे तिचे प्रेम प्रकरण उघड झाले व आई-वडिलांना कळले.ती साहिलसोबत लग्न करण्याच्या मुद्द्यावर ठाम होती. आई-वडिलांसह कुटुंबीयांनी तिची समजूत काढली मात्र उपयोग झाला नाही.तिने घरून पळून जाऊन साहिलसोबत लग्न करण्याची,तसेच लग्न न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकीही कुटुंबीयांना दिली होती.कुटुंबीयांच्या विनंतीवरून ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनीही तिला सोमवारी १६ डिसेंबरला समजावून सांगितले होते.
- Advertisement -

