Monday, August 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रवासी बोटीला धडक; १३ जणांच्या मृत्यू प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत..

प्रवासी बोटीला धडक; १३ जणांच्या मृत्यू प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ अरबी समुद्रातील एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी निलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने प्रवासी बोटचे दोन तुकडे होऊन,निलकमल बोटीला झालेल्या दुघर्टनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून दुर्घटेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखाची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी शासनाच्या वतीने केली जाईल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की,सायंकाळी ७ वाजे पर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये १० प्रवासी नागरिक असून तीन नौदलाचे जवान आहेत.शासनाच्या सर्व यंत्रणा याकामी लागल्या असून नौदल आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेऊन १०१ प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे.अजूनही बचावकार्य सुरू असून नौदलाच्या चार हेलिकॉप्टरची मदत घेतली गेली असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!