Saturday, April 18, 2026
Homeमुंबईप्रवासी बोटला धडक; तिघांचा मृत्यू तर एकाचा पाय तुटला..

प्रवासी बोटला धडक; तिघांचा मृत्यू तर एकाचा पाय तुटला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :- मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ अरबी समुद्रातील एलिफंटाला जाणाऱ्या एका प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने प्रवासी बोटचे दोन तुकडे होऊन,बुडून तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा पाय तुटला असल्याची घटना आज,बुधवार १८ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली.बोटीमध्ये एकूण ८० प्रवासी होते.त्यापैकी ७७ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले आहे.नीलकमल नावाची प्रवासी बोट नेहमीप्रमाणे आज बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून एलिफंटा लेण्यांकडे जाण्यासाठी निघाली होती.या बोटीमध्ये ८० प्रवासी होते.फेरीबोट १० किलोमीटर अंतरावर समुद्रात गेल्यानंतर नौदलाची एक स्पीड बोट त्याठिकाणी आली.सुरुवातीला नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटला चक्कर मारून निघून गेली.त्यानंतर
प्रवासी बोटपासून काही अंतरावर नागमोडी वळण घेत गेली.परंतु,नौदलाची बोट परत वेगाने प्रवासी बोटीकडे आली आणि मधोमध जोराची धडक दिली.बोटीची धडक जोरात बसल्याने प्रवासी बोटीचे मधोमध दोन तुकडे झाले आणि प्रवासी पाण्यात पडले.नौदलाच्या स्पीड बोटमध्ये एकूण ६ जण होते. बोट नौदलाची असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदलकडून चौकशी सुरू झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!