Thursday, October 22, 2026
Homeपुणेतरुणाने लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केला म्हणणे योग्य ठरणार नाही- जिल्हा सत्र न्यायालय...

तरुणाने लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केला म्हणणे योग्य ठरणार नाही- जिल्हा सत्र न्यायालय – बलात्कार प्रकरणातून तरुणाची निर्दोष मुक्तता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-महिलेला अगोदरच लग्न झाले असतांना आरोपीबरोबर लग्न करणे शक्य नाही हे माहिती होते. त्यामुळे लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केला म्हणणे योग्य ठरणार नाही.तिच्या घरात आणि आरोपीच्या घरात जबरस्तीने अत्याचार केले म्हणण्यास वाव नसल्याचे नमूद करत बलात्कार प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.साळुंखे यांनी छायाचित्रकार असलेल्या तरूणाला गुन्ह्यातून वगळण्याचा आदेश दिला आहे.रोहीत पाचारणे वय २१ वर्षे असे खटल्यातून वगळण्यातून आलेल्या तरूणाचे नाव आहे.याप्रकरणात एका २६ वर्षाच्या महिलेनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.महिला ही विवाहित असून तिला गुन्हा दाखल झाला त्यावेळी सहा वर्षाचा मुलगा आहे.डिसेंबर २०२१ मध्ये महिला रोहीत पाचारणे याच्याकडे फोटो काढण्यासाठी गेली असतांना दोघांची ओळख झाली होती.या ओळखीतून तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती.त्याने तिच्यावर तिच्या व त्याच्या घरी बऱ्याच वेळा बलात्कार केल्याचे सांगितले होते.मात्र, तरूणावर झालेल्या आरोपांमुळे तरूणाच्या वतीने ॲड.विभीषण गदादे यांनी तरूणाला खटल्यातून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
यात त्यांनी गुन्हा खोटा,बनावट व निराधार असल्याचा युक्तीवाद केला होता.तसेच दोघांमधील व्हॉट्सॲप चॅटवरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले होते.तसेच प्रथमदर्शने तरूणाने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळून आले नसल्याचा युक्तीवाद ॲड.गदादे यांनी केला. त्यावर न्यायालयाने दाखल पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यानुसार आरोपीने महिलेला लग्नाचे आमिषदाखवून बलात्कार केला; असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरावे नाहीत,त्यामुळे आरोपीविरूध्द खटला चालवणे व्यर्थ ठरेल,आरोपीला पुढे या प्रकरणातून मुक्त केले जाईल,असा निर्वाळा न्यायालयाने देताना या खटल्यातून तरूणाला मुक्त केले.
ॲड.विभीषण गदादे,तरूणाचे वकील👇
महिलांवरील बलात्काराचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांकडून अशा प्रकरणात तात्काळ दखल घेतली जाते.मात्र कायद्याचा गैरवापर करून बलात्काराच्या खोट्या तक्रारींचे प्रमाण देखील वाढत आहे.प्रेमसंबध जेव्हा बिघडतात व कालांतराने खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात.त्यामुळे तरूणांना कोर्ट कचेरी तुरूंग असा प्रवास पहावा लागतो.अशा खोट्या तक्रारींमधून बाहेर पडण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागते.ते आर्थिकदृष्ट्या पडवरणारे नसते.अशा परिस्थितीत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला बलात्काराच्या खटल्यात तरूणाला वगळण्याचा दिलेला हा महत्वपूर्ण निकाल धाडसी आणि एकमेवद्वितीय समजला जात आहे.त्यामुळे खोट्या बलात्कारांच्या तक्रारींना काही अंशी आळा बसण्यास मदत होईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!