Sunday, September 6, 2026
Homeनागपूरवळण घेतांना चालकाचे नियंत्रण सुटले.. - सहल बस खड्ड्यात कोसळून १५ वर्षीय...

वळण घेतांना चालकाचे नियंत्रण सुटले.. – सहल बस खड्ड्यात कोसळून १५ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू तर १० विद्यार्थी गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर येथील सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची सहल बस खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार तर सुमारे ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.एमएच ४०,वाय ७३५० क्रमाकांची ट्रॅव्हल्स हिंगणी मार्गावर देवळी पेंढरी गावासमोर वळण घेतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून खड्ड्यात कोसळली.
बसमध्ये ५२ विद्यार्थी,एक शिक्षक आणि एक केअर टेकर असे ५४ जण होते.यात अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार लागला असून यातील ४४ विद्यार्थी एम्समध्ये तर ७ विद्यार्थी दुसऱ्या दवाखान्यात आहे. एका १५ वर्षीय विद्यार्थीनीच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला आहे.किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हिंगण्याचे ठाणेदार जितेंद्र बोबडे हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.अपघात होताच रस्त्यानी जाणाऱ्यांनी गर्दी केली.त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होऊन काही काळ वाहतूक विस्कळित झाली.
सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या पाच बसेस विद्यार्थ्यांना घेऊन वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे जात असतांना एक बस देवळी परिसरात खड्ड्यात कोसळली.अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली.अनेक पालक सकाळी रुग्णालयात पोहोचले.आपापल्या मुलाची विचारणा शिक्षकांना करीत होते.त्यामुळे रुग्णालयातही गोंधळ उडाला होता.हिंगणी रस्त्यावरून कवडसकडे जाताना पेंढरी देवळी गावाजवळ अपघातप्रवण वळण आहे.या वळणावर गेल्या तीन वर्षात २८० पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत.तर गेल्या महिन्यात ८ अपघात झाले आहेत. हा वळण रस्ता सरळ करण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदने देऊन प्रयत्न केले आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. ‘हा रस्ता दुरुस्त करावा,अन्यथा रस्ता बंद करू’ असा आक्रमक पवित्रा पेंढरी-देवळी गावकऱ्यांनी घेतला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!