Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात संविधान दीन साजरा...

देसाईगंजच्या मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात संविधान दीन साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-संविधान दिनाचे औचित्य साधून आज,मंगळवारी २६ नोव्हेंबरला देसाईगंज शहराच्या मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाविद्यालयाचे डॉ.सुनिल चौधरी यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ.आशिष सेलोकर यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले की, ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सर्वात मोठी घटना म्हणजे संविधानाची निर्मिती मानली जाते.संविधान ही देशाची ओळख आहे.देशाची राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो.ते देशाच्या राजकीय व्यवस्थेची व्याख्या करते.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना मंजूर झाली,म्हणून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो’.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता उद्देशिकीचे वाचन करुन करण्यात आली.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!